सामुद्रिक शास्त्रानुसार नखांच्या खुणांवरून व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी कळू शकतात.
सामुद्रिक शास्त्रानुसार हाताच्या सर्वात लहान बोटाच्या नखावर पांढरी खूण असल्यास ते शुभ मानले जाते.
भविष्यात त्या व्यक्तीला करिअर किंवा व्यवसायात भरपूर यश मिळेल की नाही हे चिन्ह सांगतं.
सामुद्रिक शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या तर्जनी वर पांढरा डाग असेल तर ते देखील शुभ असते.
या चिन्हाचा अर्थ असा की त्या व्यक्तीला व्यवसायात नफा मिळेल आणि जीवनात नेहमी आनंदी राहील.
अनामिका बोटाच्या नखावर पांढरी खूण असेल तर समजावे की लक्ष्मीची त्याच्यावर कृपा आहे.
अनामिका वर खूण असल्याचा अर्थ असा की त्या व्यक्तीचे जीवन संपत्तीने भरलेले आहे.
मधल्या बोटाच्या नखावर पांढरी खूण असेल तर त्या व्यक्तीला सुखद प्रवासाची संधी मिळेल.
अंगठ्याच्या नखावर पांढरी खूण असणे देखील शुभ आहे. त्या व्यक्तीचे वैवाहिक जीवन सुखी राहते.