अहमदनगरमधील सांदण दरीत सुमारे 500 पर्यटक अडकले होते.

काजवा महोत्सवासाठी सांदण दरीत पर्यटकांनी गर्दी केली होती. 

अचानक आलेलं वादळ, पावसामुळे दरीत पाण्याचा ओघ वाढला.

सुमारे 500 पर्यटक या दरीत अडकले, त्यांना बाहेर पडणे अशक्य झाले. 

वनविभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी धाव घेतल्याने पर्यटकांचे प्राण वाचले.

नागरिकांच्या मदतीने पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

कोणतीही जीवितहानी झालेली नाही, काळजी घेण्याचं वनविभागाचं आवाहन

पावसाळ्यात सांदण दरीत जाणं अशक्य असते. पावसाळ्यात याच दरीतून खाली पाणी कोसळते

सह्याद्रीच्या कुशीत वसलेली ही दरी पाहण्यासाठी उन्हाळा उत्तम.