सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या 'चोर' गणपतीची 16 सप्टेंबरला पहाटे प्रतिष्ठापना करण्यात आली.
हा गणपती कधी येतो आणि कधी जातो हे कळत नसल्याने याला चोर गणपती म्हणण्याची पद्धत आहे.
सांगलीतला हा प्रसिद्ध गणपती आहे.
या चोर गणपतीला 200 वर्षांची परंपरा आहे.
या गणपतीची प्रतिपदेला म्हणजे चतुर्थीच्या चार दिवस आधी प्रतिष्ठापना होते.
साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना इथे केली जाते. गणपती मंदिरातील गणरायाच्या मुख्य मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन मूर्ती बसवण्यात येतात.
दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून दरवर्षी त्याच दोन मूर्तीची स्थापना केली जाते. फक्त थोडीशी रंगरंगोटी केली जाते.
उत्सवानंतर मूर्ती सुरक्षितस्थळी ठेवतात. पटवर्धन सरकार गणेशभक्त असल्याने गणेशोत्सव इथे उत्साहात साजरा होतो.