सारा अली खानने काही दिवसांपूर्वीच केदारनाथचं दर्शन घेतलं.
साराने केदारनाथ यात्रेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
केदारनाथच्या दर्शनासोबतच सारा वेगवेगळ्या ठिकाणी एन्जॉय करताना दिसली.
सारा कधी उन्हात बसून मेडिटेशन करताना दिसतेय तर कधी झऱ्याचं थंडगार पाणी पितेय.
कधी सारा हिरव्या भाज्या तोडताना दिसली तर ऋषी-मुनींचे आशीर्वाद घेतानाही दिसली.
हे पाहून यूजर्सना सुशांत सिंग राजपूतची आठवण आली.
सुशांत आणि साराने केदारनाथ सिनेमाचं शूटिंग या ठिकणीच केलं होते.
एका यूजरने लिहिले- 'काफीराना हे गाणे सुशांतची आठवण करून देते.' दुसर्याने म्हटलंय- 'व्वा दीदी, मला सुशांतची आठवण करून दिली.'
अनेकांना साराचं कौतुक केलंय. तर काहींनी हरहर महादेवचा नाराही दिलाय.