सारा अली खानचा इंडियन बार्बी लूक

Photo Credit -saraalikhan95/instagram

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

या पार्टीसाठी अभिनेत्री सारा अली खानने खास पिंक लेहेंगा घातला होता.

गुलाबी लेहेंग्यावर साराने थोडासा मेकअप केला होता. 

तिने लेहेंग्यासोबत साधी बन हेअरस्टाईल केली होती.

तिने पिंक लेहेंग्यामधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना ‘भारतीय Barbie…’ असं कॅप्शन दिलं आहे.

या फोटोमुळे काही लोकांनी तिचं कौतुक केलं आहे. तर काही लोकांनी तिच्यावर टीका केली आहे.

तिचा हा लूक अजिबात भारतीय वाटत नाही, अशी एकाने कमेंट केली आहे.

दुसरीकडे साराचा हा आत्तापर्यंतचा बेस्ट लूक असल्याची कमेंट काही लोकांनी केली आहे.

तिचे या लूकमधले फोटो खूप व्हायरल झाले आहेत.