अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाचं प्रमोशन करत आहे.
काही दिवसांपूर्वी तिने उज्जैनला महाकाल दर्शन घेतलं.
साराने देवळात जाऊन दर्शन घेतल्यानं नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.
या ट्रोलर्सविषयी साराला एकदा विचारण्यात आलं. सारा त्यावर उत्तर देताना म्हणाली मी काय करायचं हे मी ठरवेन.
सारा पुढे म्हणाली की,ज्या भक्तीच्या भावनेने मी महाकाल दर्शन घेतलं. त्याच भावनेने मी अजमेरलाही दर्शन घेईन. लोकांना काय म्हणायचंय ते म्हणूदेत.
तिच्या या उत्तराने अनेकांची बोलती बंद झाली आहे.
सारा आणि विकीचा ‘जरा हटके जरा बचके’ हा सिनेमा 2 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
तिच्या आगामी चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
तिच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा.