संपत्तीत वाढ करण्यासाठी सर्वपित्रीला कोणती कामे करावी

Life style

12  September, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला सर्वपित्री अमावस्या असते. या दिवशी पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो.

सर्वपित्री अमावस्या

असे मानले जाते की, या दिवशी सर्व ज्ञात आणि अज्ञात पूर्वजांचे श्राद्ध केल्याने त्यांचे आत्मे तृप्त होतात आणि त्यांना मोक्ष मिळतो.

मोक्ष प्राप्त होतो

या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण केले जाते. श्राद्ध पक्षाच्या अमावस्येला काही विशेष उपाय केल्याने पितर प्रसन्न होतात

काय करावे

अन्न दान

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ब्राम्हणाला जेवण द्या. गहू, फळ, गूड इत्यादींचे दान करावे. 

पिंपळाच्या झाडाशी संबंध

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ पाणी अर्पण करुन गाईसमोर तुपाचा दिवा लावा. तसेच एखाद्या नदीवर काळे तीळ दान करावे

मंत्रांचा जप

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी गाईच्या शेणाचा तुकडा जाळून त्यावर तूप आणि गूळ अर्पण करा त्यानंतर पितृ देवताभ्यों अर्पणमस्तु या मंत्रांचा जप करा 

प्राण्यांना अन्न

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी गाय, कुत्रा, कावळा, मुंग्यांना पूर्वजांचा भाग मानून अन्न दिले जाते. म्हणून त्यांना इजा होऊ नये.

आशीर्वाद 

कोणत्याही अमावस्येच्या दिवशी कावळा, पक्षी, कुत्रा आणि गायला जेवण द्यावे. असे केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात.

या दिशेला लावा दिवा

या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला तुपाचा दिवा लावावा.