स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये Job Vacancy, परीक्षा न देताच मिळणार 75 लाख पगार

SBI SCO Recruitment 2023

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये Job Vacancy, परीक्षा न देताच मिळणार 75 लाख पगार

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदासाठी 2023 च्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

इच्छुक उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 01 जूनपासून सुरू झाली आहे. तुम्ही 21 जून 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकता.

SBI SCO भर्ती 2023 च्या अधिसूचनेनुसर, एकूण 28 रिक्त जागा भरल्या जातील.

मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी, संबंधित विषयात MBA/PGDM सह बीई, बीटेक किंवा सीए केलेलं असलं पाहिजे

याशिवाय अनुभवही मागवला आहे. तुम्ही अधिसूचनेत पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा माहिती तपासू शकता.

अर्ज शुल्क आणि सूचना शुल्क 750 रुपये आणि SC/ST/PWD उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क/सूचना शुल्क नाही

वेगवेगळ्या पदांना वेगवेगळे वेतन आहे. उपाध्यक्षांसाठी प्रतिवर्षी 50.00 लाख ते रु. 75.00 लाख रुपये आहे.