वृक्षगजानन म्हणजे काय ?

आजकाल लोकांचा पर्यावरणपूरक मूर्तींकडे कल वाढला आहे.

 इकोफ्रेंडली शाडूच्या मातीच्या मूर्तीसोबतच वृक्षगजाननाचा ट्रेंड वाढतोय.

यातील अनेक गणेशमूर्ती शंभर टक्के पर्यावरणपूरक अशा शेतीच्या मातीपासून बनवलेल्या असतात.

या मूर्तींचं विसर्जन कुंडीमध्ये करता येतं. मूर्तीच्या आकाराची कुंडीही या मूर्तीसोबत दिली जाते.

मूर्तीसोबत झाडाच्या बिया दिलेल्या असतात. 

 मूर्तीचं कुंडीत विसर्जन केल्यानंतर कुंडीत  बियांसाठी रोज पाणी घालत राहावं.

कालांतराने कुंडीत छान रोप तयार होतं.

वृक्षगजानन ही संकल्पना झाडं वाढवण्याच्या प्रक्रियेत भर घालणारी आहे.