जर तुम्हाला स्वप्नात काळी मांजर दिसली तर याचा अर्थ की तुम्ही सध्या आयुष्यात चांगले काम करत नाही आहात. प्रतिमा सुधारण्याची आवश्यकता आहे.

स्वप्नात हत्ती पाहणे खूप शुभ मानले जाते. दुसरीकडे, जर तुम्ही स्वतः हत्तीवर स्वार असाल तर ते तुमची क्षमता दर्शवते.

स्वप्नात कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत असेल तर तेसुद्धा शुभ असते.

स्वप्नात ससा दिसला तर त्याचा संबंध प्रेम, कामात यश मिळेल असा लावता येतो.

जरी अस्वल खूप धोकादायक असले, तरी ते स्वप्नात पाहणे शुभ मानले जाते. त्यामुळे मनोबल वाढते. 

काळा साप स्वप्नात दिसणेही शुभ मानले जाते, त्यामुळे धनप्राप्ती होते असं म्हणतात.

सुंदर दिसणारा मोर स्वप्नात पाहणे अशुभ मानले जाते, मोर दिसला तर तुम्हाला वाईट बातमी मिळेल असं मानलं जातं.

स्वप्नात किंवा कोणताही वन्य प्राणी दिसल्यास, तुम्हाला कोर्टात किंवा हॉस्पिटलमध्ये जावे लागेल असं मानतात.

पाल तुमच्या स्वप्नात आल्यास आयुष्यात निराशा येऊ शकते असं म्हणतात.