सीमा हैदर-सचिन यांच्या लव्ह स्टोरीवरील सिनेमा'कराची टू नोएडा'चं पोस्टर रिलीज
जानी फायरफॉक्स प्रॉडक्शन हाऊस हा सिनेमा बनवणार असल्याचं अमित जानी यांनी सांगितलं
सिनेमाच्या ऑडिशनला सुरुवात झाली आहे. ऑडिशनच्या काही क्लिप सोशल मीडियावर व्हायरलही झाल्या आहेत.
प्रॉडक्शन हाऊसने जारी केलेल्या ऑडिशन क्लीपमध्ये एक मुलगी सचिनशी फोनवर बोलताना दिसत आहे.
त्या मुलीच्या बाजूला उभा असलेला मुलगा सचिनच्या ऑडिशनसाठी आला आहे.
फोनवर बोलताना दिसणारी मुलगी सीमा हैदर सारखीच असल्याचं फोटोत दिसत आहे.
सीमा हैदर या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात होतं.
मात्र सीमा आणि प्रॉडक्शन हाऊसच्या बाजूने अद्याप यावर काहीही स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाही
तर दुसरीकडे, सीमा हैदर रॉ एजंटची भूमिका साकारणार असल्याचंही म्हटलं जात आहे.