सीमा हैदरची अद्याप चौकशी सुरू आहे. ती सचिन मीणा यांच्या घरी राहात होती. 

पबजी खेळताना हे एकमेकांच्या प्रेमात पडल्याचा त्यांचा दावा आहे,नेपाळमध्ये त्यांनी लग्नही केल्याचं म्हटलं जात आहे.

बातमी समोर आल्यानंतर सीमाचे पहिला पती गुलाम हैदर यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. 

सीमा 4 मुलांसोबत भारतात आलीय. आपली मुलं आपल्याकडे परत पाठवावीत असं गुलामचं म्हणणं आहे. 

आपल्या कुटुंबाला पाकिस्तानात परत पाठवावे, असे आवाहन गुलाम हैदर सातत्याने करत आहे.

गुलामच्या म्हणण्यानुसार सीमा आणि त्याचं लग्न 2014 मध्ये झालं, 2019 ला तो सौदी अरेबियाला गेला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सचिन गुलाम हैदरला आवाहन करताना दिसत आहे.

सचिन यात म्हणतो की, "गुलाम भाई आम्ही दोघे खुश आहोत. आम्हाला इथे आनंदाने जगू द्या."

तर दुसरीकडे गुलाम हैदरचं म्हणणं आहे, त्याच्या पत्नीचे ब्रेनवॉश करण्यात आले आहे.