शाहरुखचा जवान सिनेमा ब्लॉकबस्टर ठरलाय. त्यामुळे आता शाहरुखने मानधनात वाढ केलेली आहे.

बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या 'जवान'ची चर्चा आहे. अवघ्या 6 दिवसांत जगभरात 600 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

'जवान'च्या यशानंतर चित्रपट निर्माते आणि स्टारकास्टमध्ये आनंदाचे वातावरण आहे. किंग खाननेही फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

'जवान'च्या यशानंतर शाहरुखने त्याची फी 100 कोटी रुपये केली असल्याचं म्हटलं जातंय.

'डंकी' सिनेमासाठी तो 60 टक्के नफ्यासह 100 कोटी रुपये फी घेणार असल्याची चर्चा आहे.

याबाबत अद्याप किंग खान किंवा चित्रपट निर्मात्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

'डंकी' सिनेमा राजकुमार हिरानी दिग्दर्शित करत आहेत. या सिनेमात शाहरुखसोबत तापसी पन्नू प्रमुख भूमिकेत आहे.

22 डिसेंबरला डंकी रिलीज होणार आहे. पठाण, जवाननंतर चाहत्यांना प्रतीक्षा आहे डंकी सिनेमाची