शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल केलेली आहे.
'पठाण'नंतर 'जवान'लाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
देशभरात सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादाने शाहरुखने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
जवानच्या सिनेमाचे ओपनिंग कलेक्शन सुमारे 75 कोटी झाल्याचं समजंतय
हिंदी सिनेमांमध्ये हा आकडा highest ओपनिंग डे नेट कलेक्शन असल्याचं म्हटलं जातंय.
'जवान'ने हिंदीमध्ये 65 कोटी, तामिळ 5 कोटी, तेलुगुमध्ये 5 कोटी कमावल्याचा अंदाज आहे.
जगभरात जवान सिनेमाने 120 कोटींचा आकडा गाठल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वीकेण्डला शाहरुखचा जवान काय धमाल करतो याचीच आता उत्सुकता आहे.