शाहरुख खानचा सिनेमा जवान सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 

सिनेमा कमाईच्या बाबतीत नवनवे रेकॉर्ड करत आहे. 

वीकेण्डला बॉक्स ऑफिसवर जवानने जबरदस्त कमाई केली आहे. 

शनिवारी जवान सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 68.72 कोटींचे कलेक्शन केले

शाहरुखच्या या सिनेमाने रविवारी सुमारे 85 कोटींचा टप्पा पार केला. 

 सिनेमाने चार दिवसांमध्येच नवा इतिहास रचला, वर्ल्डवाइड सिनेमाने 500 कोटींचा बिझनेस केलाय. 

या रिपोर्ट्सनुसार जवान हा जलद कमाई करणारा पहिला हिंदी सिनेमा ठरला आहे.

किंग खानच्या जवानने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 75 कोटींचे कलेक्शन केले होते.