तामिळ टीव्ही अभिनेत्री शालिनीने तिच्या नुकत्याच झालेल्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

फोटोंमध्ये शालिनी घटस्फोटाचा आनंद साजरा करताना दिसत आहे. तिने लाल रंगाचा गाऊन घातला असून हातात घटस्फोटाचा बॅनर घेतलेला दिसत आहे.

शालिनीने महिलांना घटस्फोटाचा संदेश दिला आहे.

 शालिनीने लिहिले की, "लग्न जर का चुकीच्या माणसासोबत झालं असेल तर तोडणंच चांगलं,तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणातीही तडजोड करू नका"

 शालिनीने पुढे लिहिले, "तुमच्या आयुष्यावर तुमचे नियंत्रण ठेवा आणि तुमच्या मुलांचे चांगले भविष्य घडवण्यासाठी आवश्यक ते बदल करा."

 "घटस्फोट म्हणजे अपयश नाही. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हा एक टर्निंग पॉइंट आहे."

शालिनीने तिच्या मेसेजमध्ये लिहिले की, "लग्न तोडून एकटं राहण्यासाठी धैर्य लागते."

शालिनीने जुलै 2020 मध्ये रियाझ नावाच्या व्यक्तीशी लग्न केले. दोघांना रिया नावाची मुलगी देखील आहे.

शालिनीने काही महिन्यांपूर्वी पतीवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दोघांनी घटस्फोटाचा पर्याय निवडला आहे.