Published Mar 17, 2025
By Prajakta Pradhan
Pic Credit - pinterest
सनातन धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पूजा केल्याने संकटे दूर होतात. जाणून घ्या शनि अमावस्या कधी आहे
पंचांगानुसार, यावेळी अमावस्या 29 मार्चला आहे. ही अमावस्या शनिवारी येत असल्याने त्याला शनि अमावस्या म्हटले जाईल.
चैत्र अमावस्या तिथीची सुरुवात 28 मार्चला रात्री 7.55ला होईल आणि त्याची समाप्ती 29 मार्चला संध्याकाळी 4.27 मिनिटांनी होईल
ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी ब्रह्म आणि इंद्र योग तयार होईल या योगात शनिदेवाची पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतील.
शनि अमावस्येला दुर्मिळ शिववास योगाची निर्मिती होईल. या योगात भगवान शंकराची पूजा केल्याने साधकाच्या मनोकामना पूर्ण होतात.
शनि अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करताना दिवा लावावा. यावेळी झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा मारा. असे केल्याने शनि देवाची कृपा होते
शनि अमावस्येला गरीब आणि गरजूवंताला काळ्या रंगाचे कपडे, काळी घोंगडी, काळी उडीद, काळे तीळ, लोखंडी भांडी किंवा मोहरीचे तेल दान करावे
शनि अमावस्येला या पद्धतीने पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होऊ लागतात. यासोबतच आर्थिक संकटातूनही सुटका मिळते.