ज्योतिष शास्त्रात शनीला न्याय देवता म्हटले आहे. शनीची जयंती ज्येष्ठ अमावस्येला साजरी केली जाते, याला शनि जयंती असेही म्हणतात.

यावर्षी शनि जयंती शुक्रवार, 19 मे रोजी आहे. शनि जयंतीच्या दिवशी काही पदार्थ खाणं अशुभ मानलं जातं.

ज्योतिषशास्त्रात दुधाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. शुक्र हा लैंगिक इच्छांचा कारक ग्रह आहे. तर शनि अध्यात्माशी संबंधित आहे.

 शनि जयंतीला शनीचा प्रभाव कायम राहतो. त्यामुळे या दिवशी दुधाचे सेवन करू नये. यामुळे खर्च वाढतो आणि वैवाहिक जीवनात अडचणी येतात.

शास्त्रामध्ये शनीला उग्र ग्रह मानले गेले आहे. म्हणूनच शनि जयंतीला लाल मिरची खाऊ नये असे म्हटले जाते. 

शनिदेवाचा क्रोध आणि अशुभ प्रभाव टाळायचा असेल तर शनि जयंतीला लाल मिरची खाणे टाळा, अन्यथा संकटांचा सामना करावा लागू शकतो.

 शनि जयंतीच्या दिवशी चुकूनही मसूर डाळ खाऊ नका. असे केल्यास वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल.

 शनि जयंतीच्या दिवशी चुकूनही मसूर डाळ खाऊ नका. असे केल्यास वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल.

 यंदा शनि जयंती शुक्रवारी येत आहे. या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नयेत. यामुळे लक्ष्मीचा कोप होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 

शनि जयंतीच्या दिवशी मांस, तामसी अन्न आणि मद्य सेवन करू नये. असे करणाऱ्यांचे वाईट दिवस नक्कीच सुरू होतील.