नवरात्रीत उपवास करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

नवरात्रीत उपवास करताना आहारात हलक्या पदार्थांचा समावेश करा.

उपवास करताना जास्त फळं खा म्हणजे एनर्जी टिकून राहील. 

 उपवासाचे पदार्थ दिवसातून 5-6 वेळा थोड्या प्रमाणात खा.

निर्जळी उपवास करत असाल तर लिंबू सरबत, शहाळ्याचं पाणी किंवा ताक प्या.

दिवसातून किमान 2 लिटर द्रव पदार्थ पोटात जातील याची काळजी घ्या म्हणजे चक्कर येणं, घशाला कोरड पडणं यातलं काही होणार नाही.

 उपवासाच्या दिवशी तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा उकडलेले पदार्थ खाणं चांगलं आहे.

 तुम्हाला मध्येच अचानक भूक लागली तर ड्रायफ्रूट्स खा.

 राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ याचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.

उपवासाच्या गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी गुळ किंवा मधाचा वापर करा.