नवरात्रीचा उत्सव खास मानला जातो. हा उत्सव 22 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. हा उत्सव देवी दुर्गेला समर्पित आहे
नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यादरम्यान केलेले काही उपाय जीवनात आनंद आणतात.
हा एक उपाय लवंग आणि कापूरशी संबंधित आहे. नवरात्रीमध्ये लवंग कापूर जाण्यासाठी शुभ वेळ कोणती ते जाणून घ्या
नवरात्रीमध्ये लवंग आणि कापूर जाळण्यासाठी सर्वांत चांगली वेळ संध्याकाळची मानली जाते.
असे मानले जाते की, संध्याकाळी देवीची पूजा आरती झाल्यावर लवंग आणि कापूर लावले पाहिजे.
हा उपाय केल्याने कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.
लवंग आणि कापूर जाळल्यानंतर धूर सर्वत्र पसरु द्या त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.
नवरात्रीदरम्यान लवंग आणि कापूर जाळल्याने कुंडलीमधील ग्रहांची स्थिती व्यवस्थित राहण्यास मदत होते.
यासोबतच अनेक दोष म्हणजे कालसर्प दोष, वास्तू दोष, पितृदोष यांसारखे दोष दूर होण्यास मदत होते.