ब्राह्ममुहूर्तावर स्नान आणि ध्यान केल्यानंतर गंगाजलाने पूजास्थान स्वच्छ करावे.

चौरंगावर लाल कापड पसरून देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.

देवीचं ध्यान करताना 'ओम देवी महागौरिया नमः' या मंत्राचा जप करा.

देवीला सिंधूर, कुंकू, लवंग आणि वेलची अर्पण करा.

देवीला लाल दुपट्टाही अर्पण करावा

देवीला जांभळा रंग खूप आवडतो.

9 कुमारीका घरी बोलवा, त्यांची पूजा करा.

शिरा, खीर, पुरीचा नैवेद्य दाखवा, क्षमतेनुसार दक्षिणा द्या.