शारदीय नवरात्रीत अष्टमी आणि नवमीला कन्या पूजनाने नवरात्रीची सांगता होते.
22 आणि 23 ऑक्टोबरला नवमीची पूजा करण्यात येणार आहे.
अष्टमीला महागौरी आणि नवमीला सिद्धिदात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे.
घराच्या ईशान्य कोपऱ्यात पूजा करावी. पूजेच्या वेळी तुमचे तोंड ईशान्य, पूर्व किंवा उत्तरेकडे असावे.
अष्टमी-नवमीच्या पूजेच्या वेळी तुटलेल्या अक्षता किंवा तडा गेलेली मूर्ती अजिबात पूजू नये.
या दिवशी घरात लसूण, कांदा, दारू किंवा मांसाहार करू नका.
अष्टमी,नवमीच्या दिवशी कन्या, किंवा कोणावरही राग काढू नये.
काळे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करू नये. लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ असते.