बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी लवकरच सुखी या चित्रपटात दिसणार आहे.

 नुकताच सुखी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

'सुखी'च्या ट्रेलर लॉन्चला शिल्पा शेट्टीसह चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती.

इव्हेंटमध्ये शिल्पा शेट्टी ऑल व्हाइट लूकमध्ये दिसली.

या इव्हेंटमध्ये शिल्पाने ढोलाच्या तालावर जोरदार डान्सही केला.

कुशा कपिला, दिलजान ईरानी, पवलीन गुजरालही यावेळी उपस्थित होते. 

शिल्पाने गळ्यात हेवी नेकलेस, हातात कडं  घातलं होतं. 

येत्या 22 सप्टेंबरला सुखी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.