बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी 48 वर्षांची झालेली आहे.
मात्र, तिचा फिटनेस पाहून ती 48 वर्षांची असेल असं अजिबात वाटत नाही.
योगा आणि योग्य डाएटच्या मदतीने शिल्पा शेट्टीने स्वत:ला मेंटेन केलेलं आहे.
शिल्पा शेट्टी डाएटकडे विशेष लक्ष देते, ज्वारीची भाकरी ती रोज खाते. यामुळे वजन कमी होतं.
गाजर,बीटरूट, छोले डाएटमध्ये खाते. शिल्पा शेट्टी फक्त रविवारीच गोड पदार्थ खाते
शिल्पाच्या डाएटमध्ये फळांचा मोठ्या प्रमाणास समावेश असतो.
योगामुळे कमकुवत होणारी हाडंही मजबूत होऊ शकतात असं शिल्पा शेट्टी मानते.
शिल्पा शेट्टी नियमितपणे शलभासन, विरुद्ध शलभासन, आणि बालासन ही 3 आसनं करते.