बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही पती राज कुंद्रा, मुलगा वियान आणि मुलगी समीशा बरोबर परदेश दौऱ्यावर गेली आहे.
शिल्पा कुटुंबासह लंडनमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
लंडनमधील सुंदर फोटो ती शेअर करत आहे.
शिल्पाबरोबर पती राज कुंद्राला पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
लंडन दौऱ्यावर राजला विना मास्क फिरताना पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.
कारण भारतात फिरताना अनेकदा राज कुंद्रा फेस मास्क लावूनच बाहेर पडायचा.
देशाबाहेर गेल्यावर राजची चेहरा दाखवायची हिंमत झाली आहे.
चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या पैशातून मजा करत असल्याची प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली आहे.
आता या सगळ्यावर शिल्पा काय प्रतिक्रिया देतेय हे पाहावं लागेल.