फ्लोरल प्रिंट चंदेरी साडीमध्ये शिल्पाचा मनमोहक अंदाज
अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
तिचे फ्लोरल प्रिंट चंदेरी सिल्क साडीमधले फोटो सध्या खूप व्हायरल झाले आहेत.
या व्हाईट साडीत तिचा ग्लॅमरस लूक आणि मनमोहक अंदाज दिसून येतोय.
वेगवेगळ्या पोज देत तिने या साडीमध्ये फोटोशूट केलंय.
या साडीसोबत तिने ट्यूब ब्लाऊज घातला आहे.
तिने केसांना वेव्ही टच दिलाय.
या देसी लूकमध्ये ती खूप सुंदर दिसतेय.
सप्टेंबरमध्येच तिचा ‘सुखी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे.