‘इंडियन पोलीस फोर्स’मध्ये शिल्पा शेट्टीचा डॅशिंग अवतार
रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये शिल्पा शेट्टीची एन्ट्री झाली आहे.
‘इंडियन पोलीस फोर्स’ या वेबसीरिजच्या माध्यमातून शिल्पा ओटीटीवर पदार्पण करतेय.
‘इंडिनय पोलीस फोर्स’ ही वेबसीरिज 19 जानेवारी रोजी प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.
वेबसीरिजमध्ये शिल्पा शेट्टी लेडी कॉपच्या रुपात ॲक्शन सीन करताना दिसणार आहे.
शिल्पासोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉयही या वेबसीरिजमध्ये झळकणार आहेत.
‘अब सायरन बाजेगा तो समझो अपराध की बँड बाजेगी. आ गया पोलीस! ’ असं म्हणत या वेबसीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय पोलिसांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ही वेबसीरिज बनवण्यात आल्याचं शिल्पाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
शिल्पाला नव्या भूमिकेत बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.