पिवळ्या साडीत खुललं शिल्पाचं सौंदर्य
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या लूकची आणि फॅशन सेन्सची नेहमीच चर्चा होत असते.
शिल्पा सध्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ शो मध्ये परीक्षक म्हणून काम पाहतेय.
या शोच्या एका भागासाठी ती यलो साडी नेसली होती.
तिचे या साडीतले फोटो व्हायरल झाले आहेत.
तिने पिवळ्या साडीसोबत मिरर वर्कचा ब्लाऊज घातला होता.
साडीसोबत तिने मोठे इयररिंग्स आणि मोठ्या बांगड्या घातल्या होत्या.
तिने साडीसोबत सटल मेकअप केला होता.
पिवळ्या साडीत तिचं सौंदर्य खुललं होतं.