सावरता येई ना आवरता येई, शिल्पा शेट्टी ड्रेसमुळे ट्रोल
अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससोबतच फॅशन सेन्ससाठीही प्रसिद्ध आहे.
वेगवेगळ्या ड्रेसमधले तिचे फोटो ती नेहमी शेअर करत असते.
मात्र सध्या एका ड्रेसमुळे शिल्पा शेट्टीला ट्रोल करण्यात येतंय.
शिल्पाने ऑफ शोल्डर रेड शॉर्ट ड्रेस घातला होता.
या ड्रेसमध्ये ती फारशी कम्फर्टेबल नव्हती.
ती फोटोसाठी पोज तर देत होती. पण तिला तो ड्रेस सावरता येत नव्हता.
ती वारंवार ड्रेसच्या स्लीव्ह्ज सावरण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे ट्रोलर्सनी तिच्यावर टीका केली.
जो ड्रेस सावरता येत नाही तो घालायचा तरी कशाला ? असा प्रश्न लोक तिला विचारत आहेत. तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.