१९ जूनला शिवसेनेच्या ५७वा वर्धापन दिन आहे, पण त्याआधीच दोन्ही गटात चांगलीच जुंपली आहे
दोन्हीकडून आपलीच खरी शिवसेना असा दावा केला जात आहे
ठाकरे गटाचा षण्मुखानंद येथे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे
तर शिंदे गटाचा गोरेगाव येथे शिवसेना वर्धापन दिन साजरा होणारेय
शिंदे गटाकडून वर्धापन दिनाचा टिझर देखील जारी करण्यात आला आहे
शिंदेंची शिवसेना ही जत्रेतील असल्याची टिका संजय राऊतांनी केलीय
शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी आपल्या ट्विवटर अंकाऊटवरुन वर्धापनदिनाचा व्हीडिओ शेअर केला आहे
वर्धापनदिनाला तीन दिवस बाकी असताना, आत्तापासून दोन्ही गटात खरा वर्धापनदिन कोणाचा यावरुन कलगीतुरा रंगला आहे