शिवराज्याभिषेक सोहळ्याला यंदा 350 वर्ष पूर्ण होत आहेत. 

आठ नद्यांच्या पाण्याने 11 हजार ब्राह्मणांच्या उपस्थितीत झाला शिवराज्याभिषेक

या भव्यदिव्य सोहळ्यासाठी 32 मण सोन्याचं सिंहासन तयार करण्यात आलं होतं.

राज्याभिषेकाआधी महाराजांनी सव्व मण सोन्याची छत्री भवानी मातेला अर्पण केली.

लक्ष लक्ष दिव्यांनी रायगड उजळून गेला होता.

सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे, लोखंड अशा सात धातूंनी महाराजांची तुला झाली. 

सोन्याचांदीच्या फुलांची उधळण, वाद्य आणि तोफांच्या आवाजाने किल्ले रायगड दुमदुमून गेला होता.

राजसिंहासनाचं दालन 32 शकुन चिन्हांनी सजवलेले होते.

राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत ‘शिवछत्रपती’ म्हणून आशीर्वाद दिला.