घरात योग्य ठिकाणी शूज आणि चप्पल न ठेवल्यास दारिद्र्य येऊ शकते.

वास्तुशास्त्रानुसार मुख्य दाराजवळ चप्पल काढू नये त्यामुळे नकारात्मक उर्जा येते.

घराच्या मुख्य दरवाजावर सुंदर वस्तू ठेवणे शुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी वास करते.

शूज आणि चप्पल कधीही दरवाजासमोर ठेवू नयेत. त्यामुळे घरातील सुख-समृद्धी संपुष्टात येते.

दाराजवळ बूट, चप्पल ठेवल्याने लक्ष्मीचा कोप होतो. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

असे म्हणतात की दरवाजासमोर चप्पल ठेवल्याने पती-पत्नीचे नाते कमकुवत होते.

शूज आणि चप्पल कधीही ईशान्य दिशेला ठेवू नये. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

शूज आणि चप्पल घराच्या नैऋत्य दिशेला ठेवाव्यात. असे केल्याने घरात समृद्धी येते.