यंदा अधिक श्रावण महिना आहे.
श्रावण महिन्यात शंकराचं महत्त्व जास्त आहे.
श्रावण महिन्यात दान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं.
शिवालयात ब्राह्मणांना रुद्राक्ष दान केल्याने संपत्ती वाढते असे मानले जाते.
चांदी, सोने किंवा चांदीच्या धातूपासून बनवलेल्या नागाच्या जोडीचे दान केल्याने धन-समृद्धी वाढते.
धार्मिक ग्रंथानुसार श्रावण महिन्यात दोन चांदीची नाणी दान केल्याने पुण्य प्राप्त होते.
गरजूंना कपडे आणि अन्न इत्यादी दान केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात असे मानले जाते.
शमी आणि बेलपत्र इत्यादींचे रोपटे लावणे देखील शुभ मानले जाते.