यंदा अधिक श्रावण असल्याने तब्बल दोन महिने श्रावण महिना असेल.
श्रावण महिन्याचं खूप पावित्र्य आहे.
श्रावणातल्या प्रत्येक दिवस खास मानला जातो, कारण त्यादरम्यान शिवलिंगाची पूजा केली जाते.
श्रावण
महिन्यात शिवलिंगावर या गोष्टी चुकूनही अर्पण करू नका.
शिवलिंगावर तुळस अर्पण करणे अशुभ मानलं जातं.
केतकीचं फूलसुद्धा शिवलिंगावर अर्पण करू नये.
महादेवाच्या पूजेत हळदीचा वापर केला जात नाही.
तुकडा तांदूळ पूजेसाठी वापरू नये त्यामुळे पूजेचं पावित्र्य कमी होतं असं मानलं जातं.
शिवलिंगावर तीळ अर्पण करणेही वर्ज आहे.
शंकराने शंखचूडचा वध केला होता, त्यामुळे शंखातून महादेवाच्या पिंडीला जल अर्पण करू नये.