श्रावण महिन्यातील शेवटच्या एकादशीला श्रीहरिची पूजा करावी. 

पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते - पौष आणि श्रावण शुक्ल पक्ष

पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करावी, तिच्याशी संबंधित उपायही करावेत, असे सांगितले जाते.

तुळस विष्णू देवाला खूप प्रिय असल्याचं मानलं जातं. 

पुत्रदा एकदशीच्या दिवशी या 3 चुकांपासून सावधान रहा. 

ज्योतिषांच्या मते एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करू नये. असे केल्याने विष्णू क्रोधित होतो.

एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. असे केल्याने देवी लक्ष्मीचा अपमान होतो. 

एकदशीच्या दिवशी तुळशीच्या आजूबाजूची जागा स्वच्छ ठेवा. 

 तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जाते, त्यामुळे या दिवशी तुळशीभोवती बूट आणि चप्पल ठेवू नयेत. 

या दिवशी काळं वस्त्र धारण करून तुळशीची पूजा करू नये.