शुभमन गिल हा भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज आहे.

गेल्या काही दिवसांपासून तो डेंग्यूने त्रस्त होते आणि त्याला चेन्नईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

त्याच्या प्लेटलेट्सचा काऊंट सतत कमी होत होता.

त्यामुळे शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये खेळू शकला नाही.

मात्र,आता भारतीय संघ आणि भारतीय चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

शुभमन गिलला डिस्चार्ज देण्यात आाला आहे.

शुभमन कोणत्या सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी खेळेल हे अद्याप स्पष्ट नाही.

रोहित शर्मासोबत ओपनर म्हणून इशान किशन येत आहे.

शुभमनने 35 एकदिवसीय सामन्यांमध्ये 66 च्या सरासरीने 1917 रन्स केल्या आहेत.