शुभमनने क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावले.
शुभमनने 49 चेंडूंत 4 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले.
शुभमन 60 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकार लगावत 129 धावा करून बाद झाला.
या सीझनमधील शुभमन गिलचे हे तिसरे शतक आहे.
शुभमनने याआधी RCB आणि हैदराबादविरोधात शतक झळकावले होते.
शुभमनने RCB विरोधात 104 धावांची खेळी केली .
हैदराबादविरोधात शुभमनने 101 धावा केल्या होत्या
लखनौविरुद्धच्या साखळी सामन्यात शुभमनचे शतक हुकले. तो 94 धावांवर नाबाद राहिला होता.
शुभमनने आयपीएलच्या या सीझनमध्ये 5 अर्धशतकेही झळकावली आहेत.
शुभमन आयपीएल 2023 चा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. तो 851 धावांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.