जास्त चहा घेतल्यामुळे होतात ‘हे’ दुष्परिणाम 

चहा हे अनेक देशांमध्ये लोकांचं आवडीचं पेय आहे.

मात्र जास्त प्रमाणात चहा प्यायल्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.

 तज्ज्ञांच्या मते, चहामधील कॅफिन झोपेसाठी आवश्यक मेलाटोनिन हार्मोनमध्ये व्यत्यय आणू शकते. त्यामुळे झोपेवर परिणाम होतो.

जास्त चहा प्यायल्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो.

चहा अति प्रमाणात प्यायल्याने पोटातील अ‍ॅसिड वाढून छातीत जळजळ होते आणि अस्वस्थतादेखील वाढते.

रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे मळमळ होऊ शकते.

चहा पिणं वाईट नाही पण तो कमी प्रमाणात प्यायला हवा.

कमी प्रमाणात चहा प्यायलात तरच तो आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.