झोप पूर्ण न झाल्याने वाढतो आजारांचा धोका
झोप पूर्ण न झाल्याने शरीरावर अनेक परिणाम होतात.
झोप कमी झाल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
सात -आठ तास झोप झाली नाही तर ह्रदयरोगाचा धोका वाढतो. रक्तदाबाचा त्रास निर्माण होतो.
झोप पूर्ण झाली नसेल तर थकवा वाढतो. आळस जाणवतो.
रोज 7 तासांपेक्षा कमी झोप झाल्याचा परिणाम तुमच्या स्मरणशक्तीवरही होत असतो.
निद्रानाशाचा परिणाम कॉर्टिसोल हार्मोनवर होतो. त्यामुळे तणाव वाढतो.
झोपेच्या कमतरतेमुळे भूक आणि वजन वाढतं.
कमी झोपेमुळे कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो.
तज्ञांच्या मते,18 ते 60 या वयोगटातील लोकांना निरोगी राहण्यासाठी रोज 7 तासांची झोप आवश्यक आहे.