आजच या गोष्टी सोडा, नाहीतर तुमची हाडे तुटलीच म्हणून समजा
धुम्रपानहाडांची समस्या म्हातारपणाशी जोडूनच पाहिली जाते. मात्र आता हाडांशी संबंधित समस्या तरुणांमध्येही दिसून येत आहेत.
धुम्रपान आणि हाडे फ्रॅक्चर
खराब जीवनशैली आणि आहारामुळे हाडे कमकुवत होणे आजच्या काळात सामान्य झाले आहे.
सांधेदुखीची समस्या आता तरुणांमध्येही दिसून येत आहे. यामागे अनेक कारणे आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला त्याचे एक मुख्य कारण सांगणार आहोत.
रक्तपुरवठा प्रभावित होतो
धुम्रपानामुळे हाडे आणि शरीराच्या ऊतींना रक्तपुरवठा मोठ्या प्रमाणात कमी होतो. जेव्हा हाडांना पुरेशा प्रमाणात रक्त पुरवले जात नाही, तेव्हा त्यांच्या कार्यक्षमतेवर खूप वाईट परिणाम होतो आणि हाडे हळूहळू कमकुवत होतात.
निकोटीन धोकादायक आहे
सिगारेटमध्ये निकोटीन आणि विषारी घटक आढळतात ज्याचा हाडांवर अनेक प्रकारे परिणाम होतो. सिगारेट ओढल्याने मोठ्या प्रमाणात फ्री-रॅडिकल्स तयार होतात. जे आपल्या पेशी, अवयव आणि हाडे निरोगी ठेवणार्या हार्मोन्सचे नुकसान करतात.
कॅल्शियमचे शोषण कमी होते
धुम्रपान केल्याने शरीरातील कॅल्शियमचे शोषण मोठ्या प्रमाणात कमी होते. कॅल्शियम हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यास ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो.
हार्मोन्सवर होतो परिणामधुम्रपानामुळे शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होते. महिला आणि पुरुषांमध्ये मजबूत सांगाड्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
धुम्रपानामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो आणि बरे होण्याची प्रक्रिया मंदावते. धुम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत धुम्रपान करणाऱ्या लोकांना हाडांच्या फ्रॅक्चरपासून बरे होण्यासाठी जवळजवळ दुप्पट वेळ लागू शकतो.