रात्री मोबाईल वापरून आरोग्याच्या ‘या’ समस्यांना देऊ नका आमंत्रण
रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन वापरण्याची सवय तुम्हाला असेल तर त्याचे गंभीर दुष्परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात.
रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यामुळे डोळे खराब होऊ शकतात. फोनच्या ब्राइटनेसमुळे डोळ्यांना जास्त थकवा येतो. डोळे कोरडे होतात.
तुम्ही वेळीच रात्री फोन वापरण्याची सवय बदलली नाही तर दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.
रात्री उशिरा फोन वापरण्याच्या सवयीमुळे झोपेची समस्या जाणवू लागते.
रात्री खूप वेळ मोबाईल वापरल्यामुळे डोकेदुखीचा त्रास सुरु होतो. मोबाईलच्या प्रकाशामुळे डोळ्यांवर परिणाम होतो आणि नजर कमी होऊन डोकेदुखी वाढते.
रात्री खूप वेळ मोबाईल वापरणं मेंदूसाठीपण घातक आहे.
रात्री जास्त वेळ मोबाईल वापरल्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि चिडचिडेपणा वाढतो. विस्मरण व्हायला लागतं.
रात्री जास्त वेळ मोबाईल वापरल्यामुळे स्ट्रेस आणि डिप्रेशन अशा समस्या वाढू शकतात.