परफ्युमचा अति वापर केल्यामुळे होतात ‘हे’ दुष्परिणाम

जास्त प्रमाणात परफ्युम वापरल्यामुळे त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात.

परफ्युमच्या वासामुळे डोकेदुखी होऊ शकते.

तुमची त्वचा संवेदनशील असेल तर त्वचेवर पुरळही येऊ शकतात.

परफ्युमच्या तीव्र वासामुळे उलटीचाही  त्रास होऊ शकतो.

परफ्युममध्ये पॅराबिन हे एक सिंथेटीक प्रिझर्व्हेटिव्ह असून त्याचा थेट संबध  अंत:स्रावी प्रणालीवर होतो. 

काही लोकांना परफ्युमच्या वासामुळे श्वसनासाठी अडथळा निर्माण होतो.

परफ्युमचा जास्त वापर केल्यास त्याचा परिणाम प्रजनन क्षमतेवरही होतो.

 परफ्युमचा वापर काळजीपूर्वक करा.