खूप वेळ रील्स पाहत बसणं ठरू शकतं आजारांसाठी निमंत्रण
अनेक तास रील्स बघत बसल्यामुळे शारिरीक समस्यांसोबतच मानसिक आजारही होऊ शकतात.
एका रिसर्चनुसार, खूप वेळ रील्स आणि व्हिडिओ बघत बसल्यामुळे मास सायकोजेनिक इलनेसचा त्रास होतो.
या आजाराच्या लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. बोलताना सतत पाय हलवत राहणं हे या आजाराचं पहिलं लक्षण आहे.
अनेक लोक असे असतात जे सलग एक व्हिडिओ बघू शकत नाहीत.वारंवार ते व्हिडिओ बदलत राहतात.
या अवस्थेला अटेन्शन डेफिसिट हायपरॲक्टिव्हिटी डिसऑर्डर असं म्हटलं जातं.
सतत अनेक तास मोबाईल बघत राहिल्याने पाठ आणि मानदुखीची समस्या ओढवते.
मान वाकवून खूप वेळ मोबाईल बघत बसल्यामुळे मणक्याचे विकारही उद्भवतात.
मोबाईलच्या अतिवापरामुळे झोप न येणं, मायग्रेन,डोकं दुखणं, डिप्रेशन असे त्रास सुरु होतात.
रील्सवर मिळणारे लाईक्स आणि व्ह्यूज याच्या टेन्शनमध्ये डिप्रेशन येऊ शकतं.