सिक्कीममध्ये पावसाचा रुद्रावतार,तीस्ता नदीला पूर
All Photos Credit - PTI
सिक्कीममध्ये ल्होनक लेकमध्ये ढगफुटी झाल्याने तीस्ता नदीला पूर आला आहे.
या पुरामध्ये 23 जवान बेपत्ता झाले आहेत.
मंगळवारी रात्री साधारण दीड वाजता ढगफुटी झाल्याने अचानक तीस्ता नदीचा जलस्तर वाढला.
ढगफुटीमुळे चुंगथांग धरणाचं पाणी सोडण्यात आलं.
धरणाचं पाणी सोडल्यामुळे सिंगतमजवळ बारदांगमध्ये उभ्या असलेल्या भारतीय सैन्याच्या गाड्या बुडाल्या.
या गाड्यांमध्ये सैन्याचे जवान होते.
बंगालला सिक्कीमसोबत जोडणाऱ्या एन एच 10 चा काही भागदेखील पाण्यात वाहून गेला आहे.
तीस्ता नदीला पूर आल्यामुळे सिक्कीमच्या अनेक भागांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.