उन्हाळ्यात अनेकदा लोकांना डासांचा त्रास होतो. जिथे डास चावतात तिथल्या त्वचेचा भाग सुजतो.

असे का घडते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? जाणून घ्या कारण

जेव्हा एखादा डास आपल्याला चावतो तेव्हा आपले संरक्षण करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते.

आपली त्वचा आपल्या शरीराचे जीवाणू, विषाणू यांसारख्या कोणत्याही बाह्य धोक्यापासून संरक्षण करण्याचे काम करते.

जेव्हा डासांची लाळ आपल्या शरीरात पोहोचते, तेव्हा शरीर ते foreign body म्हणून ओळखते आणि लगेचच आपली रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते.

जिथे डास चावतो तिथे रोगप्रतिकारक शक्ती एक विशिष्ट प्रकारचे रासायनिक द्रव्य  ( Histamine) हिस्टामाइन पाठवते.

 हिस्टामाइन आपल्या शरीराचे संरक्षण करण्यास मदत करते. त्यामुळे त्या ठिकाणी रक्त प्रवाह आणि पांढऱ्या रक्त पेशी वाढतात. 

 या कारणामुळे आपल्याला त्या भागात खाज येते आणि त्यामुळेच आपली त्वचा फुगते.