४० वर्षांनंतर आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत बोलल्या  स्मृती इराणी

स्मृती आपल्या खासगी आयुष्याबद्दल कधीच बोलल्या नाहीत. मात्र पहिल्यांदा आयुष्यातील अनेक कटू आठवणींबद्दल त्या व्यक्त झाल्या. निलेश मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं. आईवडिलांच्या घटस्फोटाबद्दल त्या बोलल्या

स्मृती ७ वर्षांच्या असताना त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला.  आई-वडिलांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. पण पुढे दोघांत मतभेद निर्माण झाले आणि त्यांचं नातं घटस्फोटापर्यंत आलं.

माझं पहिलं घर गुडगावमध्ये होतं. आजही मला ते आठवतं. घरात झाडू मारायचं, स्वच्छतेचं काम माझ्याकडे होतं. त्या घराचा फक्त एक फोटो माझ्याकडे आहे. या घराची अखेरची आठवण मी ७ वर्षांची असतानाची आहे.

१९८३ साली एकेदिवशी मी आणि माझ्या बहिणी आम्ही काळी डाळ  (उडदाची काळी डाळ) खात होतो. मग अचानक एखाद्या फिल्मी सीनसारखी माझी आई आली आणि तिने रिक्षा थांबवली.

तिने सामान आवरायला घेतलं. लवकर जेवण आटपा, आपण दिल्लीला निघणार आहोत, असं ती आम्हाला म्हणाली.

तो एक दिवस आणि आजचा दिवस... त्यानंतर मी काळी डाळ कधीच खाल्ली नाही. खरं तर काळी डाळ माझ्या खूप आवडीची होती