प्रोटीन आणि कॅल्शिअमयुक्त खाल्याने हाडं मजबूत होतात, मात्र काही अशा गोष्टींच्या अतिसेवनाने हाडं कमकुवत होतात.
हे पदार्थ खाल्ल्याने तुमची हाडं कमकुवत होऊ शकतात, तेव्हा खाताना काळजी घ्या.
मीठ जास्त प्रमाणात खाल्यास ते हाडांमधील कॅल्शिअम शोषून घेते. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिसची समस्या सुरू होऊ शकते.
नेहमी 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. मीठातील सोडियम शरारीसाठी हानिकारक आहे.
साखरेचं प्रमाणही गरजेपेक्षा जास्त नसावे त्यामुळे हाडं कमकुवत होतात.
संशोधनानुसार जास्त प्रमाणात दारू प्यायल्यानेही शरीरातील हाडांचे नुकसान होऊ शकते.
जास्त प्रमाणात कार्बोनेटेड ड्रिंक्स प्यायल्याने फ्रॅक्चरचा धोका वाढतो.
मासांहारामधून प्रोटीन मिळत असले तरी ते योग्य प्रमाणात खा.
पालकामधील ऑक्सालेट पदार्थ शरीरासाठी आवश्यक असलेलं कॅल्शिअम शोषून घेण्यास अडथळा बनते.
पालकात व्हिटामिन्स आणि खनिजं मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे योग्य प्रमाणात त्याचं सेवन करा.
या सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.