बदाम खाणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे, त्यातही रात्री भिजवलेला बदाम सकाळी खाणं केव्हाही उत्तम

 भिजवलेल्या बदामाचं साल काढून खाल्ल्यास खूप फायदा होतो.

भिजवलेला बदाम खाल्ल्याने पचनक्रियेत सुधारणा होते. 

बदामामध्ये अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे सहज पचन होते. 

भिजवलेल्या बदामामुळे शरीराला जास्त न्यूट्रीशन्स मिळतात. 

वजन कमी करण्यासाठीही भिजवलेला बदाम खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे. 

मेटाबॉलिझम रेट वाढवण्यासाठीही भिजवलेला बदाम खाणं चांगलं. 

म्हातारपणात भिजवलेले बदाम खाणे खूप गुणकारी आहे. यामुळे पचन आणि दातांच्या समस्या दूर राहतात.

 मात्र, बदाम खाण्याचा अतिरेकही करू नये, त्यामुळे नुकसानही होऊ शकते.