ग्रेटर नोएडामधील एका सोसायटीने खाली फिरताना लुंगी आणि नाईटी घालू नका असा आदेश दिला.

सोसायटीचे ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं, यूजर्सनी त्याला कडाडून विरोध केलाय 

 विरोधानंतर सोसायटीच्या अध्यक्षांनी हा आदेश नसून विनंती असल्याची नोटीस जारी केली. 

 "सोसायटीच्या आवारात फिरताना तुमचे कपडे, वागणूक याकडे लक्ष द्यावे"

"लहान मुलं मोठ्यांचंच अनुकरण करतात" असा उल्लेखही पत्रात करण्यात आला होता. 

योगा करणाऱ्यांनाही लुंगी नेसून योगा करू नका अशी विनंती कऱण्यात आली होती.

 सोसायटीच्या पत्रावरून वाद झाल्यानंतर अध्यक्षांनी स्पष्टीकरण दिले. 

लुंगी नेसण्यावरून सोसायटीतल्या महिलांनीही तक्रार केल्याचं अध्यक्षांनी स्पष्टीकऱणात म्हटलं आहे.