एकटं फिरायला अनेकांना आवडतं.सोलो ट्रिपसाठी जगभरातील टॉप 10 ठिकाणं कोणती ते आपण जाणून घेऊयात.
सोलो ट्रिपसाठी व्हिएतनामचं हनोई शहर सगळ्यात जास्त सुरक्षित आहे. इथली ऐतिहासिक ठिकाणं आणि खाद्यसंस्कृती यांचा अनुभव तुम्ही घेऊ शकता.
जगातील सोलो ट्रिपसाठी सुरक्षित दहा शहरांच्या यादीत थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकचा दुसरा नंबर लागतो.
तैवानमधील तैपेई तिसऱ्या क्रमांकावर आहे. इथे अनेक निसर्गरम्य ठिकाणं आणि आधुनिक आर्किटेक्चरचे नमुने पाहायला मिळतील.
दक्षिण कोरियातील सियोल हेदेखील एकटं फिरणाऱ्यांसाठी उत्तम ठिकाणं आहे.
कंबोडियातील नोम पेन्ह हे शहर सोलो ट्रिपसाठीच्या सुरक्षित शहरांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. याला पर्ल ऑफ एशिया असंही म्हटलं जातं.
व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी हे शहर फ्रेंच वसाहती, वास्तुकला, स्ट्रीट लाइफसाठी ओळखलं जातं.
मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये तुम्ही कमी खर्चात फिरू शकता.
ऑस्ट्रेलियातील पर्थ शहर ऐतिहासिक ठिकाणांसोबतच शांत समुद्र किनारे, निसर्गरम्य उद्याने यासाठी प्रसिद्ध आहे.
सिंगापूर शहरातील उंच इमारती, उद्याने, शॉपिंग मॉल्स इथे फिरणं हा एक वेगळा अनुभव आहे.
ऑस्ट्रेलियातील सिडनी हे सुद्धा फिरण्यासाठी उत्तम शहर आहे. समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक ठिकाणं अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे बघता येतील.